नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस असून शेतकऱ्यांच्या मुद्द्यांसह विविध विषयावरून विरोधकांनी विधाननपरिषदेत गोंधळ घातला. भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर संसदेत केले वादग्रस्त विधान केले. यावरून सर्व स्तरावर शहा यांचा विरोध करण्यात येत आहे.
लोकसभा, राज्यसभा आणि विधानपरिषदेतही याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. अमित शाह यांनी आंबेडकरांची, देशाची माफी मागावी, अशी मागणी करताना शाह यांच्या या भूमिकेवर भाजपने उत्तर द्यावे, असे युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.
एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आंबेडकर आम्हाला देवाअगोदर आहेत. ते आमच्या मना-मनात आहेत. श्वासात आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी अमित शाह यांच्या पोटातील गोष्ट ओठावर आल्याचा टोला लगावला.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अमित शाह यांच्या या विधानाचा निषेध करत सभागृहात गोंधळ घातला.