Advertisement
नागपूर: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी न केल्याने नाराज झालेले ओबीसी तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुन्हा आता ओबीसींचा मुद्दा उचलून धरला आहे. मी राज्या-राज्यात जाणार आहे. ओबीसींचा एल्गार करणार आहे.
ही लढाई अस्मितेची आहे. एका मंत्रिपदाची लढाई नाही. प्रश्न मंत्रिपदाचा नाही. ही लढाई आमच्यावर कुरघोडी करणाऱ्यांविरोधात आहे, असे ओबीसी तथा ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हटले.
नाशिक येथील संपर्क कार्यालयात त्यांनी समता परिषद आणि कार्यकर्त्यांनी संवाद साधला. ‘शून्यातून लढा देऊन निर्मिती करणारे लोक आहोत. आपण पुन्हा लढू, हा लढा मंत्रिपदाचा नाही, तर अस्मितेचा आहे’, अशी भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.