नागपूर: शहारातील रेशीमबाग परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. आज राष्ट्रीय स्वंयसेवक कार्यालयाकडून आज हिवाळी अधिवेशनाला उपस्थित असलेल्या महायुतीच्या आमदारांना संघाचे मुख्यकार्यालय असलेल्या रेशीमबागेत निमंत्रित करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीचे अनेक आमदारही उपस्थित होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघ मुख्यालयात जाण्याचे पुन्हा एकदा टाळल्याचे पाहायला मिळाले.
रेशमीबागेच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी माध्यमांनी बोलताना माझ्या राजकीय जीवनाची सुरवात ही संघातूनच झाली असल्याचे सांगितले.रेशीमबागेत जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. त्यानंतर हेडगेवार यांच्या दर्शनाने ऊर्जा आणि प्रेरणा मिळते, अशी प्रतिक्रियाही शिंदे यांनी प्रसार माध्यमांना दिली. संघ परिवारांशी माझे नाते लहानपणापासून आहे. मी लहानपणी संघाच्या शाखेत जायचो. संघ परिवार आणि शिवसेना यांचे विचार सारखेच आहेत. निरपेक्ष भावनेने कसे काम करावे, हे संघाकडून शिकावे.
संघाच्या शाखेतून माझ्या राजकीय जीवनाची सुरवात ही संघातूनच झाली. फडणवीस हे संघाचे स्वयंसेवक आहेत, ते मुख्यमंत्री झाले ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.
मी यापूर्वीही रेशीमबागेत आलो असल्याचे ते म्हणाले. फडणवीस हे संघाचे स्वयंसेवक आहेत, ते मुख्यमंत्री झाले ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. संघाच्या 5 लाख शाखा आहेत, राष्ट्रउभारणीत संघाचे मोठे काम आहे.कुठल्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता, संघाचा स्वंयसेवक काम करीत असतो, असेही ते म्हणाले.