नागपूर : महाराष्ट्र विधानसभेत पुन्हा एकदा लव्ह जिहादचा मुद्दा गाजला. एवढेच नाही तर याविरोधात कठोर कायदा करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
भाजप आमदार प्रवीण दटके यांनी नागपूर शहरातील लव्ह जिहादचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. भाजप आमदाराने आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करतानाच भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी केली.
लव्ह जिहादचा कायदा मागील काही दिवसांपासून खुपच चर्चेला आला आहे. महाराष्ट्रत सुध्दा हा कायदा करण्यात येणार अशा चर्चा महाराष्ट्रात चालू झाल्या आहेत. या आगोदर हा कायदा उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये लागू आहे. या कायद्यात कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत आपण जाणून घेवू या.
‘लव्ह जिहाद’ म्हणजे काय?
लव्ह ‘जिहाद’ हा एक अनधिकृत शब्द आहे जो कट्टर हिंदू गटाकडून वापरला जातो जो मुस्लिम पुरुषांनी प्रेमाच्या जाळ्यात फसवून हिंदू मुलींचे धर्मातर करण्याच्या कटाला लव्ह जिहाद म्हणतात. लव्ह जिहाद दोन शब्दांनी बनला आहे. इंग्रजी भाषेतील लव या शब्दाचा अर्थ प्रेम आणि अरबी भाषेतील शब्द जिहाद असा होतो. याचा अर्थ एखादे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपली पूर्ण शक्ती लावणे. म्हणजे जेव्हा एका विशिष्ट धर्माचे अनुयायी दुसऱ्या धर्मातील मुलींना अडकवून त्यांचे धर्मांतर करतात, तेव्हा या संपूर्ण प्रक्रियेला लव्ह जिहाद म्हणतात.