नागपूर : महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. गेल्या चार दिवसांत विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यात सभागृहात आणि सभागृहाबाहेर अनेक मुद्द्यांवरून गदारोळ पाहायला मिळाला. बीड, परभणीसह कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर विरोधक सरकारला कोंडीत पकडत आहेत.
त्याचवेळी सत्ताधारीही विरोधकांना अशाच पद्धतीने प्रत्युत्तर देत आहेत. अधिवेशनाच्या पाचव्या दिवशीही याच मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील काँग्रेस कार्यालयावर काल रात्री महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या हल्ल्यात काँग्रेसचे बरेच कार्यकर्ते जखमी झाले या गंभीर प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त करत आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पाऱ्यांवर आंदोलन करत विधानभवन परिसर दणाणून सोडला. मुंबईतील काँग्रेस कार्यालया च्या शेजारी पोलीस आयुक्त कार्यालय आणि न्यायालय असताना देखील शेकडोच्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयावर कसे धडकले असा प्रश्न काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी उपस्थित केला.