Advertisement
नागपूर : राज्यभरात सुरू असलेल्या बनावट औषधांच्या विक्रीवर आज विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनात निदर्शने केली.
राज्यभरात बनावट औषधांचा पसारा वाढला असून दररोज कोट्यवधी रुपयांची बनावट औषधे बाजारात विकली जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. बनावट औषध प्रकरणात गुंतलेल्या अनेक कंपन्या गुजरात राज्यातील असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.
राज्यभरात बनावट औषधांचा सुळसुळाट वाढला आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागातून कोट्यवधी रुपयांचा बनावट औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे.