नागपूर : नागपुरात एकीकडे कुत्र्यांची संख्या वाढली आहे, तर दुसरीकडे त्यांचे हल्लेही वाढले आहेत. त्यामुळे रेबीजचा धोकाही वाढला आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास आठ महिन्यांत कुत्र्यांनी पाच हजार लोकांचा बळी घेतला आहे.
भारतात आढळून आलेल्या ‘रेबीज’च्या रुग्णांपैकी ९७ टक्के रुग्ण हे मोकाट कुत्र्यांचे बळी आहेत. जगात दरवर्षी सुमारे 55 ते 60 हजार लोकांचा रेबीजमुळे मृत्यू होतो. यामध्ये भारतातील सुमारे 25 ते 30 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागतो. मृतांमध्ये १५ वर्षांखालील मुलांची संख्या सर्वाधिक आहे.
महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपोली स्त्रीरोग, सदर रोग निदान केंद्र, महाल रोग निदान केंद्र आणि आयसोलेशनमध्ये कुत्रा चावल्यानंतर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या ५,९२७ आहे.
यात मेयो, मेडिकल आणि सरकारी आणि खासगी रुग्णालयातील आकडेवारीचा समावेश नाही. त्यामुळे आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.