नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर शंका उपस्थित करत काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहून ५० जागांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. या ठिकाणी जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत ५० हजार मतदार जोडल्याचा दावा त्यांनी केला होता.
यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेसला ६६ पानांचे प्रत्युत्तर दिले आहे. निवडणूक आयोगाने प्रत्येक जागेची चौकशी करून काँग्रेसला याबाबत स्पष्टीकरण दिले.
५० विधानसभेच्या जागांवर जुलै ते नोव्हेंबर ५० हजार मतदार जोडण्याचा काँग्रेसचा आरोप तथ्यात्मक स्वरुपात चुकीचा आहे. असे काहीही झालेले नसल्याचे आयोगाने म्हटले आहे. आम्ही प्रत्येक सीटचे तपशील तपासले आहेत,असेही ते म्हणाले.
काँग्रेसने केलेल्या ‘या’ दाव्याला आयोगाचे प्रत्युत्तर –
काँग्रेसने जुलै ते नोव्हेंबर दरम्यान ५० मतदारसंघात ५० हजार मतदार जोडले होते असा दावा केला होता. त्यांचे म्हणणे असे होते की, या ५० जागांपैकी भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीने ४७ जागांवर निवडणूक जिंकली कारण मतदानाचा खेळ खेळला. मात्र आता निवडणूक आयोगाने प्रत्येक दाव्याला उत्तर दिले आहे.