Published On : Mon, Dec 30th, 2024
By Nagpur Today Nagpur News

खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा 1 जानेवारीला

पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक विजयी खेळाडूंचा होणार सन्मान

नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सातव्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा बुधवारी 1 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहामध्ये सायंकाळी 5.30 वाजता सातव्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा तसेच क्रीडा संघटनांना ध्वज वितरण केले जाईल.

या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे आणि विशेष अतिथी म्हणून भारतीय पॅरा ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष पद्मश्री देवेंद्र झांझरिया उपस्थित राहतील, अशी माहिती माजी महापौर खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक श्री. संदीप जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, कोषाध्यक्ष आशिष मुकीम, सदस्य पद्माकर चारमोडे, सचिन देशमुख, अशफाक शेख उपस्थित होते.

Gold Rate
Wednesday 05 Feb. 2025
Gold 24 KT 84,400 /-
Gold 22 KT 78,500 /-
Silver / Kg 96,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

खासदार क्रीडा महोत्सवाच्या सातव्या पर्वाच्या तारखांची घोषणा समारंभामध्ये देशाचा अभिमान असलेले पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंचा विशेष सन्मान अतिथींच्या हस्ते करण्यात येणार आहे. बॅडमिंटन पुरुष एकेरीत सुवर्ण पदक विजेता नितेश कुमार, ऍथलेटिक्स भाला फेक मध्ये सुवर्ण पदक विजेता सुमित अंतिल, तिरंदाजी वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदक विजेता हरविंदर सिंग, ऍथलेटिक्स क्लब थ्रो मध्ये सुवर्ण पदक विजेता धरमबीर नैन, ऍथलेटिक्स उंच उडीमध्ये सुवर्ण पदक विजेता प्रवीण कुमार, ऍथलेटिक्स भाला फेक मध्ये सुवर्ण पदक विजेता नवदीप सिंग, महिला गटात 10 मीटर एअर रायफल शुटिंगमध्ये सुवर्ण पदक विजेती अवनी लेखारा या खेळाडूंनी पॅरा ऑलिम्पिकमध्ये आपल्या कामगिरीने जगात संपूर्ण देशाचे नावलौकिक केले आहे.

या सर्व खेळाडूंना खासदार क्रीडा महोत्सव समितीद्वारे बुधवारी 1 जानेवारी 2025 रोजी महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. यंदाचा खासदार क्रीडा महोत्सव मागील सहा महोत्सवांच्या तुलनेत अधिक भव्य आणि आकर्षक ठरणार आहे. तरी या समारंभाला शहरातील खेळाडू, क्रीडा संघटक आणि क्रीडा प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी महापौर, खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक श्री. संदीप जोशी यांनी केले आहे.

खासदार क्रीडा महोत्सवाच्या आयोजनासाठी खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, कोषाध्यक्ष आशिष मुकीम, सदस्य नागेश सहारे, पद्माकर चारमोडे, डॉ. संभाजी भोसले, डॉ. विवेक अवसरे, सचिन देशमुख, अशफाक शेख, अमित संपत, सतिश वडे, सचिन माथने, सुनील मानेकर, लक्ष्मीकांत किरपाने, विनय उपासनी, डॉ. सौरभ मोहोड, आशिष पाठक, प्रकाश चांद्रायण आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

Advertisement