Advertisement
नागपूर: नागपूरकरांसाठी एक महत्त्वाची बातमीआहे. मध्य रेल्वे, नागपूर विभागाने नागपूर ते पुणे आणि मुंबई दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे.
जर रेल्वे बोर्डाने यावर सहमती दर्शवली तर येणाऱ्या काळात प्रवाशांना आणखी एक मोठी सुविधा मिळू शकते.
नागपूर येथील विभागीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग यांनी ही महत्त्वाची माहिती दिली.
नागपूर ते पुणे आणि मुंबई अशी वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, या गाड्यांची येथे आवश्यकता असल्याने हा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.