नागपूर : देशात दिवसेंदिवस रस्ते अपघातांची संख्या वाढत चालली आहे. हे पाहता परिस्थितीत केंद्र सरकारने जखमी झालेले नागरिक आणि मृत्यू झालेल्या नागरिकांच्या जवळच्या नातेवाईकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मोठी घोषणा करत अपघातग्रस्तांसाठी ‘कॅशलेस ट्रीटमेंट’ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत सरकार रस्ते अपघातातील पीडितांसाठी सात दिवसांच्या उपचारांसाठी 1.5 लाख रुपयांपर्यंतचा खर्च करणार आहे.सोबतच हिट अँड प्रकरणांमध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांसाठी 2 लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले.
दिल्लीतील भारत मंडपम येथे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वाहतूक मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली. या बैठकीचा उद्देश वाहतूक धोरणांमध्ये सुधारणा करणे आणि रस्ते सुरक्षा वाढविण्यासाठी होता.
रस्ते सुरक्षेला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. 2024 मध्ये सुमारे 1.80 लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यापैकी 30 हजार मृत्यू हेल्मेट न घातल्यानं झाले आहेत. गंभीर बाब म्हणजे 66 टक्के अपघात हे 18 ते 34 वयोगटातील लोकांचे झाले आहेत. शाळा-महाविद्यालयांसारख्या अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश करण्याकरिता आणि बाहेर पडण्याकरिता अपुरी व्यवस्था असते.
शाळांकडे जाण्यासाठी ऑटोरिक्षा आणि मिनी बससाठीही नियम करण्यात आले आहेत. कारण यामुळे बरेच मृत्यू कमी झाले आहेत. सर्व ब्लॅक स्पॉट्स ओळखण्यात आले आहेत. सर्वजण अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.