नागपूर: शहरातील हुडकेश्वर परिसरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंध असल्याचा संशयावरून पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी आरोपीने हत्या नाही तर हा अपघात असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर हुडकेश्वर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपूर्वी भाड्याने घेतले नवीन घर –
मृत महिलेचे नाव राखी पाटील (२७ असे आहे.तर आरोपी पतीचे नाव सुरज पाटील (३४) असे आहे. हे जोडपे त्यांच्या दोन मुलांसह (वय ५ आणि ३) दोन दिवसांपूर्वीच तुळजाई नगरमध्ये भाड्याच्या घरात राहायला गेले होते.
जुना वाद मृत्यूचे कारण बनला-
काही दिवसांपूर्वी राखी अचानक घरातून गायब झाली. यामुळे सूरजला तिचा दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय आला. राखी परतल्यानंतर दोघांमध्ये सतत भांडणे सुरू झाली. गुरुवारी हा वाद इतका वाढला की, रागाच्या भरात सूरजने राखीच्या डोक्यावर जड वस्तूने वार करून तिचा खून केला.
अपघात झाल्याचे भासवून पोलिसांची दिशाभूल-
हत्येनंतर, सूरज राखीला मेडिकल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. पोलीसांना सागितले की त्याची पत्नी ती इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडली आहे. पण पोलिसांना घटनास्थळी रक्ताचे डाग आढळले, ज्यामुळे संशय आणखी बळावला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक तात्काळ मेडिकल हॉस्पिटल आणि घटनास्थळी पोहोचले. घटनेचा तपास सुरू केला. सुरुवातीच्या तपासातच राखीचा मृत्यू पडल्यामुळे नसून डोक्याला दुखापत झाल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी सूरजला अटक केली.हत्येनंतर सूरज त्याच्या मुलांसह पळून गेला, परंतु पोलिसांनी काही तासांतच त्याला पकडले. आरोपींची चौकशी सुरू आहे.
हुडकेश्वर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.