Published On : Mon, Jan 13th, 2025
By Nagpur Today Nagpur News

खासदार क्रीडा महोत्सव : साई युवक, छत्रपती क्रीडा मंडळाचा विजय

खासदार क्रीडा महोत्सव विदर्भस्तरीय खो-खो स्पर्धा
Advertisement

नागपूर. केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील खो-खो स्पर्धेमध्ये साई युवक क्रीडा मंडळ अमरावती संघाने पुरुष गटात आणि छत्रपती क्रीडा मंडळ नागपूर संघाने महिला गटात विजय मिळविला. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे ही स्पर्धा सुरु आहे.

पुरुष गटात साई युवक अमरावती संघाने एस.एस.पी.एस. वर्धा संघाचा २५-१८ अशा गुणांनी पराभव केला. साई युवक संघाकडून पियुष डहाट ने २.३० मिनिटाचा खेळ केला. तर सौरभ नवघरे ने १.३० मिनिटांसह ४ गडी बाद केले. तर एस.एस.पी.एस. वर्धा संघाच्या भावेश जाधवने १ मिनिट खेळून २ गडी बाद केले. चिन्मय लोखंडेने ४० आणि २० सेकंद खेळून ६ गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात साई युवक अमरावती संघाने राळेगाव संघाचा २९-१४ अशा गुणफरकाने पराभव केला. साई युवक संघाच्या पियूष डहाट ने उत्तम खेळ करू २.३० मिनिटांच्या खेळासह २ गडी बाद केले. अमन सरवरे ने २.३० मिनिटांसह २ गडी आणि अनुराग धानोरकर ने ४ गडी बाद केले.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 78,700 /-
Gold 22 KT 73,200 /-
Silver / Kg 91,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महिलांच्या सामन्यात छत्रपती क्रीडा मंडळ नागपूर संघाने श्री गुजराथी नागपूर संघावर २२-०२ ने एकतर्फी विजय मिळविला. छत्रपती क्रीडा मंडळाच्या छत्रपती रेश्मा धावडे ने ५.३० मिनिटांचा उत्तम खेळ केला. रोहणी दर्शे ने ६ गडी आणि मिनाक्षी दरवडे ने ६ गडी बाद केले.

खासदार क्रीडा महोत्सव : विदर्भस्तरीय खो खो स्पर्धा

मानकापूर क्रीडा संकुल

निकाल

पुरुष

१. राजापेठ स्पोर्टिंग अमरावती मात विदर्भ बुनियादी नागपूर (४२-१६)

राजापेठ – आदित्य नागदिवे १.१० मि. ६ गडी, वैभव कुकडे २.५० मि., अनुराग कुबडे ६ गडी

विदर्भ – नितीन पंधरे ६ गडी, फैजान शेख १.००, ०.३० मि., २ गडी

राजापेठ स्पोर्टिंग एक डाव २६ गड्यांनी विजयी

२. तुळजाई क्रीडा खल्लार मात संत गाडगेबाबा मुर्तीजापुर (३६-३०)

तुळजाई – रोहन मेश्राम १.००, १.२० मि, ४ गडी, सुर्वेश डोके १.००, ८ गडी, सोमेश चव्हाण १.१० मि, ४ गडी

मुर्तीजापुर – हर्षल पुनसे ०.३०, ०.५०, १० गडी, शिवम शिंदे १.२०, १२ गडी

तुळजाई क्रीडा मंडळ ६ गडी ३ मिनिट विजयी

३. साई युवक अमरावती मात एस.एस.पी.एस. वर्धा (२५-१८)

साई – पियुष डहाट २.३० मि, सौरभ नवघरे १.३० मि, ४ गडी

वर्धा – भावेश जाधव १.००मि, २ गडी, चिन्मय लोखंडे ०.४०, ०.२० से. ६ गडी
साई युवक एक डाव ६ गड्यांनी विजयी

४. छत्रपती संभाजी वरोरा मात जगदंबा माता कोराडी (२९-२२)

छत्रपती – अनिकेत तामटकर १.३०, २.३० मि, ४ गडी, आर्यन उईके ०.४० मि, ६ गडी, मंगेश दोडके १.४०, ०.४० मि, ४ गडी

छत्रपती संभाजी ६ गडी ४.३० मि. विजयी

५. महाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर मात अल्फानेरी बुलढाणा (२७-१६)

महाराष्ट्र – चेतन दांडेकर २.३० मि,यश शेंडे ६ गडी

बुलढाणा – युवराज लांडगे १.२०, ०.३० मि, करण चंगल ४ गडी

महाराष्ट्र क्रीडा एक डाव ११ गड्यांनी विजयी

६. संघर्ष क्रीडा वाशिम मात एस.एस.पी.एम. हिंगणा

संघर्ष – सुमेध ढोकणे ६.२०, ०.३० मि, ६ गडी, दत्ता मिरासे ३.५०, १० गडी

हिंगणा – रोहित खंडाईत १.१०, १.२० मि, २ गडी, मयुर दाते ३.२०, १.०० मि, ४ गडी

संघर्ष क्रीडा ४ गड्यांनी विजयी

७. साई युवक अमरावती मात राळेगाव (२९-१४)

साई – पियूष डहाट २.३० मि, २ गडी, अमन सरवरे २.३० मि, २ गडी, अनुराग धानोरकर ४ गडी

साई युवक १५ गड्यांनी विजय

८. श्रीराम क्रीडा मुसेवाडी मात सिपना अंबादेवी चिखलदरा (२७-१६)

श्रीराम – स्वप्नील सलाते २.३० मि, ४ गडी, बादल उईके १.४० मि, ४ गडी

चिखलदरा – रोहन लोखंडे १.१० मि, ६ गडी

श्रीराम क्रीडा ११ गड्यांनी विजयी

महिला
१. छत्रपती युवक नागपूर मात श्री गुजराथी नागपूर (२२-०२)

छत्रपती – रेश्मा धावडे ५.३० मि, रोहणी दर्शे ६ गडी, मिनाक्षी दरवडे ६ गडी

गुजराथी –

छत्रपती क्रीडा मंडळ २० गड्यांनी विजयी

२ विदर्भ युथ क्रीडा काटोल मात न्यू तुळजाई परतवाडा (२७-१८)

विदर्भ – नेहा पेठे २.१० मि, ६ गडी, अनुष्का इंगोले २.१० मि, ८ गडी, नियुक्ती गुजवार १.१० मि, ६ गडी

विदर्भ युथ क्रीडा एक डाव ९ गड्यांनी विजयी

३. तालुका क्रीडा वरोरा मात विदर्भ युथ लाडगाव (२५-२०)

तालुका – जोत्स्ना आकुलवार १.४० मि, ६ गडी, देवी कुशवाह १.०० मि, ६ गडी

विदर्भ – अश्विनी इरपाती ०.५०, ०.५० मि, ८ गडी, धनश्री वंजारी १.१०, १.४० मि.

तालुका क्रीडा वरोडा ५ गडी २ मिनिट विजयी

४. नवक्रांतिज्योती चंद्रपूर मात महाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर (२६-१७)

चंद्रपूर – सोनाली भेंडारे ३.२० मि, ६ गडी, सोनू आदि २.४०, ०.१० मि, २ गडी, निकिता राजनकर ०.३० मि, ६ गडी

नवक्रांतिज्योती चंद्रपूर ९ गड्यांनी विजयी

Advertisement