नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील तिरंदाजी स्पर्धेमध्ये नील हिंगे, विनया नारनवरे, गोपू चरण, कनक चेलनी यांनी पुरुष व महिला गटात सुवर्ण पदक प्राप्त केले. मोहता सायन्स कॉलेजच्या मैदानात तिरंदाजी स्पर्धा सुरु आहे.
तिरंदाजी स्पर्धेमध्ये कम्पाउंड प्रकारात नील हिंगे ने सुवर्ण, हर्ष माटे ने रौप्य आणि शलाय खडगी ने रौप्य पदक पटकाविले. याच प्रकारात महिलांमध्ये विनया नारनवरे, सिद्धी चन्ने, इस्टर निरोज कुजूर यांनी सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक पटकाविले.
रिकर्व प्रकारामध्ये पुरुष गटात गोपू चरण ने सुवर्ण, नचिकेत आसरे ने रौप्य आणि प्रेमांश दमाहे ने रौप्य पदकाची कमाई केली. तर महिला गटात कनक चेलनी ने पहिले, प्रण्या शिंदे ने दुसरे आणि आदिती गुप्ता ने तिसरे स्थान प्राप्त केले.
निकाल (प्रथम, द्वितीय व तृतीय)
कम्पाउंड
पुरुष : नील हिंगे, हर्ष माटे, शलाय खडगी
महिला : विनया नारनवरे, सिद्धी चन्ने, इस्टर निरोज कुजूर
10 वर्षाखालील मुली : चैताली मेश्राम, अन्वी मालोकर
13 वर्षाखालील मुले : यथांश पिल्लेवार, निनाद तरवरकर
मुली : तनिष्ठा सोनटक्के, वैष्णवी लछोडे
15 वर्षाखालील मुले : वेदांत लछोडे, कार्तिक नखाते, शौर्य कुथे
मुली : नैकेती प्रधान, अक्षरा गित्ते, वैष्णवी लछोडे
17 वर्षाखालील मुले : वेदांत लछोडे, ओम मानकर, संस्कार वानखेडे
मुली : अक्षरा गित्ते, आरल गजगजते, सुप्रिया जाधव
रिकर्व
पुरुष : गोपू चरण, नचिकेत आसरे, प्रेमांश दमाहे
महिला : कनक चेलनी, प्रण्या शिंदे, आदिती गुप्ता
10 वर्षाखालील मुले : शिवांश मेहाडिया, धीश दावडा, कियान मुरारका
मुली : लावण्या बलानी, नामोश्री कुर्वे
13 वर्षाखालील मुले : आर्यन अग्रवाल, विआन शाह
मुली : आरोही मवालेख अक्षदा मरकाम, धनश्री कनोजे
15 वर्षाखालील मुले : मोहम्मद झैद इमामुल रहमान खान, जगदीश भिताडे, पार्थ गौतम
मुली : वेदश्री नवघरे, राशी खापर्डे
17 वर्षाखालील मुले : नमिश आत्राम, मोहम्मद झैद इमामुल रहमान खान, जगदीश भिताडे
मुली : कनक चेलनी, प्रिशा अंधारे, वेदश्री नवघरे