Advertisement
नागपूर : नायलॉन मांजावर बंदी असतानाही हा आदेश धुडकावून संक्रांतीला पतंगबाजी करण्यात आल्याचे प्रकार ठिकठिकाणी उघडकीस आले.
नायलॉन मांजामुळे नागपुरात अनेक नागरिकांसह पक्षांनाही हानी झाली. रविवारी १९ जानेवारीला प्रताप नगर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या खामला चौक येथील आंतरभारती आश्रमच्या बाजूला पिंपळाच्या झाडावर नायलॉन मांजामध्ये अडकलेल्या कबुतरला जीवनदान देण्यात आले.
नरेंद्र नगर अग्नीशमन केंद्रातील पथकाने मांजामध्ये अडकलेल्या कबुतराचे रेस्क्यू करून त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.
सुशील ढवळे नावाच्या व्यक्तीला झाडावरच कबुतर जखमी अवस्थेत दिसला. तातडीने त्याने रेस्क्यू सेंटरला कॉल केला. घटनेची माहिती मिळताच झाडे, राठोड, शंभरकर,जुमडे, हादवे हे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी यशस्वीरित्या कबुतराच्या जीव वाचवला.