नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील दिव्यांगांच्या विविध स्पर्धांना बुधवार २२ जानेवारी पासून सुरुवात झाली. हनुमान नगर क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महावविद्यालयात दिव्यांगांच्या विविध स्पर्धा सुरु आहेत.
बुधवारी अस्थिव्यंग प्रवर्गातील खेळाडूंच्या स्पर्धा पार पडल्या. सिटिंग व्हॉलिबॉल स्पर्धेमध्ये प्रहार संघाने सेव्हन वंडर संघाला पराभवाचा धक्का देत विजेतेपद पटकाविले. ऑरेंज सिटी संघ तिसऱ्या स्थानावर राहिले. क्रिकेट स्पर्धेत उत्तर नागपूर संघाचा पराभव करुन व्हीडीसीए संघाने विजय मिळविला. विजेत्या संघाकडून विकास सामनावीर तर गुरुदास राऊत सर्वोउत्कृष्ट गोलंदाज आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू तसेच लोकेश मारखेडे सर्वोउत्कृष्ट फलंदाज ठरला.
२० वर्षाखालील वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांच्या कॅरम स्पर्धेमध्ये श्लोक राहुलकर व सिद्धार्थ घनगौरकर या जोडीने मुलांमध्ये पहिले स्थान प्राप्त केले. दुसऱ्या स्थानी पीयूष गाडगे व विल्सन गायकवाड ही जोडी राहिली. मुलींमध्ये श्रावणी मडावी व चांदणी कातुके या जोडीने पहिला आणि दुर्गा जंवजाळ व प्रिन्सी बन्सोड या जोडीने दुसरा क्रमांक पटकाविला.
मॅरेथॉनमध्ये मुलांच्या २ किमी अंतराच्या शर्यतीत विक्की धुर्वे ने सुवर्ण, गौरव नांदणे ने रौप्य आणि समीर उपरकार ने कांस्य पदक पटकाविण्याची कामगिरी केली. ओम नागमोते व अनिस उईके यांना प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुलींच्या १ किमी अंतराच्या शर्यतीत लावण्या राऊत ने सुवर्ण, मानवती धुर्वे ने रौप्य आणि महिमा खंडाते ने कांस्य पदक प्राप्त केले. नेहा आगशे आणि गायत्री धुर्वे यांना प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आले.
अन्य निकाल
गोळा फेक : व्हिलचेअर वयोगट – १२ ते १६ वर्षे
मुले : अनिरुद्ध नेवारे, वैभव उईके, अखिलेश मस्के
मुली : मानवती धुर्वे, लावण्या राऊत, दुर्गा जोंजाड
१०० मीटर दौड
अप्पर खुला गट मुले : स्वप्निल ढालखंडाईत, अनिष उईके, साहिल सहारे
अप्पर खुला गट मुली : रागिनी सलामे, खुशी भोयर, गायत्री सोळंके
लोव्हर खुला गट मुले : कुणाल शेंडे, अजय दहिकर, नितेश खोब्रागडे
लोव्हर खुला गट मुली : आरती नंदेश्वर, रेषमा सराठे, सोनू चौधरी