नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच चालली आहे.२२ आणि २३ जानेवारीच्या मध्यरात्री सक्करदरासह वाठोडा परिसरात दोन व्यक्तींच्या हत्येने शहर हादरल्याचे पाहायला मिळाले.
पहिली घटना सक्करदरा पोलीस स्टेशन अंतर्गत मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली आहे. सहा ते सात जणांनी मिळवून एकाची दगडाने ठेचून हत्या केली. अमोल पंचम बहादुरे(वय ४२, रा.भोसले नगर झोपडपट्टी भांडे प्लॉट ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच सक्करदरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यानंतर याप्रकरणी कुख्यात गुंड दिनेश गायकी याला अटक केली.
तसेच प्रवीण ढिंगे,शुभम हटवार, प्रतीक गाठे असे इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.घटनेदरम्यान आरोपींची मृतक अमोलची किया गाडीही फोडली. चिमणाझरी एका खदानच्या जागेवरून आरोपी आणि मृतकांमध्ये वाद सुरु होता.या वादावरून अमोल याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर अली असून सक्करदरा पोलिसांनी या घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.
तर दुसरी घटना
वाठोडा पोलीस अंतर्गत रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. भांडेवाडी परिसरातील गोंड मोहल्ला येथे सात ते आठ जणांनी मिळून एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची माहिती आहे. अमोल वंजारी (वय ३१) असे मृतकाचे नाव आहे. वाठोडा पोलिसांनी याप्रकरणी सर्व आरोपींना अटक केली असून जुन्या वादातून हा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणीही पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
नागपुरात घडलेल्या दोन्ही घटनेने शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.