नागपूर – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित खासदार भजन स्पर्धेची महाअंतिम फेरी रविवार दि. २ फेब्रुवारी २०२५ ला घेण्यात आली. या स्पर्धेत जुने कैलाश नगर येथील गुरुमाऊली भजन मंडळ महाविजेते ठरले. या मंडळाला २१ हजार रुपये रोख व गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले. ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते सर्व पुरस्कार विजेत्या मंडळांना गौरविण्यात आले.
रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहाल महाअंतिम फेरी आयोजित करण्यात आली. सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या प्राथमिक फेरीतून सर्वोत्तम २० भजनी मंडळांची महाअंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.
पुरस्कार वितरण सोहळ्याला आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, माजी महापौर अर्चना डेहनकर, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे जयप्रकाशजी गुप्ता, महिला आघाडीच्या अध्यक्ष प्रगती पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
७ ते १२ जानेवारी दरम्यान घेण्यात आलेल्या प्राथमिक फेरी स्पर्धेत नागपुरातील ६ विभागांतील ५८३ भजनी मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. सर्व भजनी मंडळींद्वारे श्रीकृष्ण भक्तीचा जागर करण्यात आला. खासदार भजन स्पर्धेत नागपुरातील सहभागी ५८३ भजनी मंडळांना प्रत्येकी १५००/- रुपये मानधन आणि प्रमाणपत्र देण्यात आले .
भजन स्पर्धेचे संयोजन डॉ. श्रीरंग वराडपांडे यांनी केले. खासदार भजन स्पर्धेच्या यशस्वितेसाठी अमोल ठाकरे, विश्वनाथ कुंभलकर, माया हाडे, सपना सागुळले, श्वेता निकम, श्रधा पाठक, रेखा निमजे, विजय येरणे, दर्शना नखाते, सुजाता कथोटे, अभिजित कठाले, श्री. ढबले, अतुल सगुळले आदींनी परीश्रम घेतले.
स्पर्धेचा निकाल
प्रथम क्रमांक – गुरुमाउली भजन मंडळ, जुने कैलास नगर (२१ हजार रुपये रोख)
द्वितीय क्रमांक – सुरस्वरांगिणी भजन मंडळ, मानकापूर (१५ हजार रुपये रोख)
तृतीय क्रमांक – रत्नक्षी भजन मंडळ (११ हजार रुपये रोख)
चतुर्थ क्रमांक – स्वामी समर्थ भजन मंडळ रेशिमबाग (७ हजार रुपये रोख)
पाचवा क्रमांक – स्वामी सुमीरन भजन मंडळ, वासुदेव नगर (५ हजार रुपये रोख)
युवा गट
प्रथम क्रमांक – सारस्वत भजन मंडळ (१५ हजार रुपये रोख)
द्वितीय क्रमांक – स्वरा भजन मंडळ, महाल (११ हजार रुपये रोख)