नागपूर : मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील कुरई टूरिया गेट जवळ शिकार करण्याच्या हेतून रानडुक्करचा पाठलाग करणाऱ्या वाघाचा नेम चुकल्याने दोन्ही प्राणी विहिरीत पडल्याचा व्हिडीओ सोशल मुडियावर तुफान व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये वाघासह विहिरीत रानडुक्कर पडल्याचे दृश्य पाहून गावकऱ्यांना धक्काच बसला.
विहिरीत पडताच दोन्ही प्राणी पुन्हा उभे राहण्यासाठी धडपडत असताना, त्यांना तेथून पळून जाता आले नाही.
विहिरीभोवती जमलेले गावकरी सुरुवातीला अशा असामान्य आणि असुरक्षित परिस्थितीत भयानक शिकारी आणि त्याचा शिकार पाहून थक्क झाले. एकाच ठिकाणी वाघाचे पिल्लू आणि रानडुक्कर दोन्ही दिसल्याने तातडीने त्यांना रेस्क्यू करण्यासाठी पाऊले उचलण्यात आली.
वन्यजीव बचाव पथकांना घटनास्थळी बोलावण्यात आले. अथक परिश्रमानंतर दोन्ही प्राण्यांना विहिरीतून बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे.