मुंबई : राज्याच्या विकासासाठी उद्योग क्षेत्र हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे मोठ्या प्राणात रोजगारही उपलब्ध होतो. मात्र खंडणीसाठी व्यापाऱ्यांना त्रास देण्यात येत आहे.
पैशांसाठी व्यपाऱ्यांना त्रास दिल्यास थेट मकोका लावा, असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिले आहे.उद्योगांना त्रास देणाऱ्या सर्वांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या (MCOCA) माध्यमातून कारवाई करा आणि थेट जेलमध्ये टाका, असे आदेश ही फडणवीस यांनी पोलिसांना दिले आहे.
त्याला सोडू नका पुणेसह संपूर्ण राज्यात उद्योगाचे केंद्र आहेत. पुणे मध्ये अनेक मोठे उद्योग येत आहे पण काही लोक त्यांना त्रास दिला जात असल्याची तक्रारी उद्योगांकडून केली जात आहे. या तक्रारीची नोंद घेत उद्योगांना त्रास देणाऱ्या कोणत्याही पक्षाचा असला, तरी त्याला सोडू नका असे आदेश फडणवीस यांनी दिले आहे. उद्योगांना त्रास देणाऱ्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या (मकोका) माध्यमातून कारवाई करा असा आदेशही फडणवीस यांनी पोलिसांना दिले आहे.
दरम्यान राज्यातील उद्योगांना काही लोक खंडणी मागून त्रास दिल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. पुण्यामध्ये अशा प्रकारच्या मोठ्या तक्रारी पाहायला मिळत आहेत. यामध्ये काही विशिष्ट पक्षाचे लोक उद्योगांना त्रास देतात अशी माहिती आहे.
यामध्ये भाजपचे असतील, राष्ट्रवादी अजित पवार यांचे असतील, शिवसेना एकनाथ शिंदे यांचे असतील ते कोणत्याही पक्षाचे असले, तरी त्यांच्यावर ‘मकोका’ची कारवाई करा असे आदेश फडणवीस यांनी दिले आहे.