नागपूर : फुटाळा तलाव हे नागपूर, भारतातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. ते त्याच्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी ओळखले जाते. मात्र सध्या फुटाळा शहरातील टवाळखोर तरुणांनी हैदोस घालण्यास सुरुवात केली आहे.
नुकतेच परीसरात सेल्फी पॉइंटसाठी उभारलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये घुसून दोन तरुण हैदोस घालतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
फुटाळा तलावावर प्रशासकीय अधिकाऱ्यांची देखरेख नाही का? शहरातील पर्यटन स्थळाचा दर्जा मिळालेल्या फुटाळा तलावाकडे सध्या स्थानिक अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसते.येथील अनेक वस्तूंवर जंग चढू लागला आहे. तर काही भागाची दुरवस्था झाल्याचे दिसून येते. या परिसरात केलेल्या सौंदर्यीकरणाची अवस्था वाईट आहे.तेथे लावण्यात आलेली शिल्पे एकतर तुटलेली आहेत किंवा गायब झाली आहेत. तिकीट खिडक्या आणि त्या आवारात स्थापित करण्यात आलेले भारतीय वायुसेना दलाच्या हेलिकॉप्टरवरही धूळ पडला आहे. तिकीट खिडक्यांजवळ कचरा, दारूच्या बाटल्या आणि फेकून दिलेले रॅपर पडलेले असतात. याकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
View this post on Instagram