Advertisement
नागपूर, शिवजयंतीचे औचित्य साधून उद्या बुधवार दि. 19 फ़ेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता महावितरणच्या विद्युत भवन कार्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होणा-या या पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाला सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, वरिष्ठ अधिकारी व विविध संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित राहणार असून अधिकारी व कर्मचा-यांनी शिवजयंतीच्या या शुभदिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.