नागपूर: जगप्रसिद्ध पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघ, बिबट्यासह अनेक वन्य प्राणी आढळतात. यासोबतच पेंचमध्ये अनेक दुर्मिळ प्राणी देखील दिसतात. यापैकी एक म्हणजे ब्लॅक पँथर. गेल्या दोन वर्षांत पेंचमध्ये ब्लॅक पँथर दिसला आहे.
तथापि, त्याची संख्या अभयारण्यात फक्त एक आहे. पण ते पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येथे पोहोचत असतात.
दरम्यान,ब्लॅक पँथरचा एक फोटो समोर आला असून यात तो दगडावर बसून आराम करताना दिसत आहे १५ मार्च २०२४ रोजी पहिल्यांदा पेंचमध्ये ब्लॅक पैंथरचे दर्शन झाले. येथील गाईड त्याला ‘काला’ असे म्हणतात.
तो अडीच वर्षाचा आहे. काला सहसा त्याच्या आईसोबत दिसतो.संध्याकाळी अंधार पडू लागल्यावर तो सहसा फिरताना दिसतो.