मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे
मध्यरात्री एक तास भेट घेऊन दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. या भेटीवरून जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला. दरम्यान या भेटीसंदर्भात स्वतः जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले.
बावनकुळे आणि माझी भेट सांगली जिल्ह्यातील महसूलच्या प्रश्नाबाबत झाली, कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. काल संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी माजी आणि बावनकुळे यांची भेट झाली .
सांगली जिल्ह्यातील महसूल प्रश्नांवर मी त्यांना दहा-बारा निवेदन दिले. ते देण्यासाठीच त्यांना वेळ मागितली होती. महसूल वीभागात सातबारा संगणीकरण ऑनलाइन केले. त्याच्या दुरुस्त्या वेळेवर होत नाहीत. हा राज्याचा प्रश्न होता. त्याकडे त्यांचे लक्ष वेधल. काय जमिनीचे विषय होते. जिल्ह्याचे बरेच प्रश्न होते त्यासाठी त्यांना भेटलो. त्यांच्या घरी 25 मिनिटांची भेट झाली. यात काय राजकीय चर्चा नाही. सोबत राधाकृष्ण विखे पाटील होते, असे पाटील यांनी सांगितले.