Advertisement
नवी दिल्ली : महाराष्ट्रात सर्व राजकीय पक्ष आतुरतेने वाट पाहत असलेल्या मुंबई महानगरपालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
ओबीसी आरक्षणाशी संबंधित याचिकेमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या या निवडणुका आता आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने 4 मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रलंबित बीएमसी निवडणुकांशी (BMC Elections) संबंधित याचिकांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे.
आता पुढील सुनावणी 4 मार्च रोजी होणार आहे. या प्रकरणाची माहिती देताना निवडणूक आयोगाच्या उच्च अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुनावणीनंतर निकाल जाहीर झाल्यावर निवडणुकीची तयारी करण्यासाठी किमान 90 दिवस लागू शकतात.