नागपूर : मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय उडवून देण्याचा धमकीचा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना आल्याने खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी वरळी पोलिसानी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.
माहितीनुसार, एका पाकिस्तानी नंबरवरून ट्रॅफिक पोलिसांना व्हॉट्सॲपवर हा धमकीचा मेसेज आला होता. बुधवारी दुपारच्या सुमारास हा मेसेज आला होता, त्यानंतर पोलिस यंत्रणा या अलर्ट मोडवर असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मेसेज करणाऱ्या व्यक्तीने मालिक शहाबाज हुमायून राजा देव असे नाव सांगितले, अशी माहिती समोर आली. आरोपी भारताचा आहे कि भारत बाहेरील आहे, याचा तपास पोलिसांनी सुरु केला. या आरोपीने मेसेजमध्ये स्पष्टपणे म्हटले की, आम्ही मुख्यमंत्री कार्यालयावर मोठ्या प्रमाणात हल्ला करू.यानंतर महाराष्ट्र पोलीस आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने या धमकी प्रकरणाची संयुक्त चौकशी करण्यास सुरुवात केली.