नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना अश्लिल शिवीगाळ करणाऱ्या तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर अडचणीत सापडले आहे. कोरटकर विरोधात कोल्हापूर मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
कोरटकर याला ताब्यात घेण्यासाठी कोल्हापूरमधून पोलिसांचे एक पथक त्याच्या नागपुरातील मनीष नगर येथील घरी पोहोचले. मात्र त्यांच्या घराला कुलूप लागले होते.
कोरटकर मध्य प्रदेशातील बालाघाट परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, एक पथक तिकडे रवाना झाले आहे. दरम्यान, कोरटकरला अटक करीत कठोर कारवाई करावी, यासाठी सकल मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांचीदेखील भेट घेतली. कोरटकरने केवळ सावंत यांना धमकीच दिली नाही तर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्यदेखील केले