नागपूर: नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल हे विविध उपक्रम राबवण्याकरिता ओळखले जातात. नागपूर शहरामध्ये विविध उपक्रम सुरू आहेत, जसे- ऑपरेशन थंडर, मिशन मुक्ती, तसेच विविध जनजागृती विषयक उपक्रम पोलीस आयुक्त यांच्याद्वारे राबवले जात आहेत. महाविद्यालयांमध्ये सायबर क्लब राबविणे, नो हॉर्निंग मोहिम, वाहतूक विभागासाठी हेल्पलाइन नंबर, “डायल ११२ – नई सोच” असे अनेक उपक्रम सध्या सुरू आहेत.
या उपक्रमांच्या अंतर्गत पोलीस आयुक्तांनी आणखी एक नवीन उपक्रम सुरू केला.ज्याचे नाव “मिशन जीवन रक्षा” आहे.या उपक्रमाचा उद्देश रस्त्यावरील प्राणांकित णांकित अपघात कमी करणे आणि लोकांच्या जीवाची रक्षा करणे हा आहे. रस्ते आणि अपघात यामध्ये होणाऱ्या मृत्यूमध्ये दरवर्षी १०% घट करण्याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाने परिपत्रक निर्गमित केलेले आहे.
पोलीस आयुक्त यांचा सुरुवातीपासूनच नागपूर शहरामध्ये प्राणघातक अपघातांमध्ये निष्पाप लोकांचा बळी निष्काळजीपणामुळे जाणार नाही. याकरिता उपाययोजना सुरू आहे. यासाठी वाहतुकीचे योग्य नियमन, वाहतुकीविषयी जनजागृती, नो हॉर्निंग मोहिम, शहरातील डार्क झोन दूर करणे, सीसीटीव्ही कार्यप्रणाली अधिक सक्षम करणे, कमांड कंट्रोल सेंटर प्रभावीपणे कार्यान्वित करणे या विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. अपघाताची कारणे पाहता असे दिसून येते की निष्काळजीपणा आणि भरधाव वेगाने वाहन चालवण्यामुळे अपघात होत आहेत.
त्यामुळे निष्पाप लोक नाहक बळी जात असून, अनेक गंभीर जखमी होऊन त्यांना कायमचे अपंगत्व येत आहे. त्यामुळे अपघातांवर आळा घालणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याकरिता “मिशन जीवन रक्षा” नागपूर शहरात प्रभावीपणे राबवले जाणार आहे.या उपक्रमासाठी पोलीस आयुक्तांनी स्वतः पुढाकार घेतला असून काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तांनी वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती माधुरी बाविस्कर यांना पोलीस विभागाकडून प्राणांकित अपघात होऊ नये याकरिता आपण स्वतः सुमोटो प्रयत्न करूया आणि तळा घरातील पोलीस अंमलदार जे प्रत्यक्ष स्वतः वाहतुकीची रहदारीचे नियमांचे पालन करतात त्यांच्याकडून वास्तविक परिस्थितीचा आढावा घ्यावा असे निर्देश दिले. त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती बाविस्कर यांनी जागतिक महिलादिनी नागपूर शहरातील १० वाहतूक झोनमधील वाहतूक पोलीस निरीक्षकांची बैठक आयोजित केली.
या बैठकीमध्ये मागील वर्षी झालेल्या प्राणघातक अपघातांची संख्या, चालू वर्षी आतापर्यंत झालेल्या अपघातांची संख्या आणि एकूण अपघातांची आकडेवारी याचा आढावा घेण्यात आला. नागपूर शहरातील प्राणघातक अपघातांचे प्रमुख ठिकाणे इंदोरा वाहतूक परिमंडळ मध्ये खोब्रागडे चौक ते साई मंदिर कटिंग, मंगळवारी बाजार कटिंग ते तथागत चौक, कपिल नगर चौक ते कामगार नगर चौक, मारुती शोरूम चौक ऑटोमोटिव चौक, प्रधानमंत्री आवास ते पिली नदी चौक, विटाभट्टी चौक ते विनोबा भावे नगर गेट कटिंग, कामठी वाहतूक परिमंडळ अंतर्गत चिखली चौक, सर्जा बार भारत नगर कटिंग, जुना पार्टी नाका ते हेमंत सेलिब्रेशन, कापसी उड्डाणपूल परिसर, सकरदरा वाहतूक परिमंडळ अंतर्गत संघर्ष नगर चौक, सोनेगाव सीताबर्डी वाहतूक परिमंडळ अंतर्गत छत्रपती चौक छत्रपती चौक ते मेट्रो स्टेशन, खामला चौक, सदर वाहतूक परिमंडळ अंतर्गत मानकापूर चौक नवीन काटोल नाका चौक, एमआयडीसी वाहतूक परिमंडळ अंतर्गत वाडी टी पॉइंट ते शुभम मंगल कार्यालय पावर हाऊस समोर अमरावती रोड असे विविध एकूण १८ अपघात प्रवण प्राणांकित अपघाताचे ३३ पोलीस स्टेशन अंतर्गत ठिकाणे शोधण्यात आले. या सर्व ठिकाणी पोलीस आयुक्तांनी दिलेल्या निर्देशांनुसार सहाय्यक आयुक्त बाविस्कर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्येकी ५ बॅरिकेड्स लावून त्यावर स्टिकर आणि रिफ्लेक्टर बसवण्याचे आदेश दिले.
कोणत्याही कुटुंबावर प्राणघातक अपघातामुळे ओढवणारे संकट फार मोठे असते. उपचारासाठी मोठा खर्च तर होतोच तसेच जरी जीव वाचला तरी कायमचे अपंगत्व येऊ शकते. त्यामुळे विनाकारण जीव गमवणाऱ्या नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी, त्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी “मिशन जीवन रक्षा” प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे.या मोहिमेच्या यशस्वितेसाठी नागपूर शहरातील नागरिकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. आपण सर्वांनी मिळून “मिशन जीवन रक्षा” हे यशस्वी करूयात! “कारण घरी कोणी तरी वाट पाहत आहे!” असे प्रतिपादन यावे पोलीस आयुक्त यांनी केले.