नागपूर : शहरातील प्रताप नगर परिसरातील प्रसिद्ध रेस्टॉरंट्स राम भंडार मध्ये एअर कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन आग लागली. या हॉटेलमधील ही दुसरी घटना आहे. आगीची घटना घडली तेव्हा रेस्टॉरंट्स बंद होते. मध्यरात्री ही घटना घडली. त्यामुळे जीवित हानी झाली नाही. मात्र हॉटेलमधील अनेक वस्तू आगीत जळून खाक झाल्या.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या त्रिमूर्तीनगर अग्निशमन विभागाचे तीन बंब प्रतापनगरातील राम भंडारमध्ये प़हचले व त्यांनी आग विझवली.
अमृत फार्म मध्ये लागलेल्या आगीत दोन कार जाळून खाक-
खापरखेडा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शहरातील गुमथळा येथे अमृत फार्म्समध्ये होळी पार्टी सुरू असताना अचानक दोन कारला आग लागल्याने खळबळ उडाली.ही आग इतकी भीषण होती की दोन्ही कार काही वेळातच जळून खाक झाल्या.यादरम्यान सुगत नगर अग्निशमन विभागाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविले.
आदित्य विला लॉन बेसा-पिपळा रोड चंद्रप्रस्थ लॉनच्या मागे आगीची घटना –
बेसा-पिपळा रोड असलेल्या आदित्य विला लॉनमध्ये आगीची घटना घडली. नगर पंचायत बेसा-पिंपळा अग्निशमन केंद व नरेंद्रनगर साग्निशमन केंद्र यांनी संयुक्तरित्या मिळून आग पूर्णपणे आटोक्यात आणल्याची माहिती आहे. या आगीत अंदाजे १२ लाखांचा माल जाळून खाक झाला आहे.
आसोली गाव भंडारा रोडवर टायरला आग –
आसोली गाव भंडारा रोडवर टायरला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती मिळाली नसली तरी आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.