नागपूर: औरंगजेबाची कबर हटवण्याच्या आंदोलनानंतर उपराजधानी नागपूरच्या महाल परिसरात हिंसाचार उसळला. सुमारे १००० च्या संख्येने असलेल्या दंगलखोरांनी काही घरांवर दगडफेक करत वाहने पेटवली. मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी हिंसाचाराबद्दल मोठा दावा केला.
दटके म्हणाले की, हा हिंसाचार एका कटाचा भाग म्हणून घडवून आणण्यात आला होता. बाहेरून आलेले लोक महाल परिसरात घुसले आणि हिंसाचार केला, लोकांच्या घरांची तोडफोड केली.बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी दगडफेक केली आहे.
गाड्या पेटवल्या गेल्या. मला अशी माहिती मिळाली आहे की जेव्हा अग्निशमन दल आग विझवण्यासाठी आले तेव्हा दलाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली.
प्रवीण दटके यांनी दावा केला आहे की, त्यांच्याकडे १५० हून अधिक व्हिडिओ आहेत. बाहेरील लोकांनी सामान्य लोकांची घरे जाळली. यामध्ये दुरुपकर कुटुंब, पेशणे कुटुंब, घाटेन कुटुंब, शिर्के कुटुंब यांचा समावेश आहे. त्यांच्या घरांवर दगडफेक केल्याचे वृत्त आहे.
सकाळी परिस्थिती वेगळी होती. पण बाहेरील लोक योजना आखून आले आणि त्यांनी दगडफेक आणि जाळपोळ सुरू केली. दोन्ही गटातील लोक म्हणतात की कॉलनीतील लोकांनी हे केले नाही.आता दोन्ही बाजूंचे लोक रस्त्यावर उभे राहून दंगलखोरांना पोलिसांच्या ताब्यात देत असल्याचे दटके म्हणाले.