नागपूर : औरंगजेबच्या कबरीवरून सोमवारी रात्री नागपुरात हिंसाचाराची घटना घडली. यादरम्यान अनेक पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. तसेच महाल आणि हंसापुरी परिसरात वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली.
दरम्यान या घटनेनंतर आता नागपुरात अनेक ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आला असून, पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी हिंसाचार झालेल्या परिसराचा आढावा घेतला. दगडफेक, जाळपोळ या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक रश्मी शुल्का यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यानंतर आता पोलीस आयुक्तांकडून शहरात पाहाणी केली जात आहे. नागपुरात अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
आठ ते नऊ ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये इमामवाडा, यशोधरानगरसह आठ ते नऊ ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.ज्या परिसरातून या तणावाला सुरुवात झाली. त्या भागाची पोलीस आयुक्तांकडून पाहाणी करण्यात आली आहे. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली. नागपुरात अनेक ठिकाणी आज संचारबंदी आहे, संचारबंदीचा आढावा घेण्यासाठी आज पोलीस आयुक्तांनी ग्राऊंड लेव्हलवर जाऊन पाहाणी केली , सुरुक्षेचा आढावा घेतला.या परिसरात आणखी काही इनपूटस् आहेत का याची पाहाणी पोलीस आयुक्तांकडून करण्यात येत आहे.
नागपुरात आता शातंता आहे, मात्र अजूनही लोकांच्या मनात भीती आहे. ही भीती दूर करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.पुन्हा असा काही प्रकार घडू नये, यासाठी आमचे सर्व अधिकारी कर्मचारी प्रयत्न करत आहेत. संचारबंदी लागू आहे, त्याचा आढावा घेण्यासाठीच आम्ही सध्या इथे आलो आहोत.संपूर्ण शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असल्याचेही सिंगल म्हणाले.