Published On : Mon, Mar 24th, 2025
By Nagpur Today Nagpur News

मी कुणाल कामराच्या पाठीशी…;उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया समोर

Advertisement

मुंबई : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एका गाण्यातून उपहासात्मक टीका केली. त्याने अप्रत्यक्षपणे शिंदेंना गद्दार म्हणून संबोधित केले. आता याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. कॉमेडिअन कुणाल कामराने सत्य आसलेल्या जनभावना मांडल्या आहेत. जे चोरी करत आहेत, त्यांनी गद्दारी केली आहे.

मी कुणाल कामराच्या पाठीशी आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी नुकतंच विधानभवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांना कुणाल कामराबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट प्रतिक्रिया दिली.

Gold Rate
Monday 31March 2025
Gold 24 KT 90,500 /-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg 101,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मी कुणाल कामराच्या पाठीशी आहे,असे उद्धव ठाकरे म्हणाले. कुणाल कामराने काहीही चुकीचे म्हटले असे मला वाटत नाही. कुणाल कामराने सत्य असलेल्या जनभावना मांडल्या आहेत. जे चोरी करत आहेत, त्यांनी गद्दारी केली आहे. मी कुणाल कामराच्या पाठीशी आहे.

सुपारी सुपारी काय बोलता? नागपूरच्या दंगलीची सुपारी कोणी दिली होती. औरंगजेबाच्या कबरीची सुपारी कोणी दिली होती? राज्य आणि देश तुमच्या हातात आहे तरी दंगल कशी होते? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. काल जी तोडफोड केली आहे, ती गद्दार सेनेने केली आहे. शिवसेनेनी केलेली नाही. या गद्दारांना कोरटकर, सोलापुरकर दिसत नाही.

मुख्यमंत्री महोदयांना सांगू इच्छितो की न्याय सगळ्यांना समान पाहिजे. त्या स्टुडिओला तोडफोडीची भरपाई दिली पाहिजे. अभिव्यक्ती स्वातांत्र्य कुठले आम्ही तर उघडपणे बोलतो. मुख्यमंत्र्यांचे अधिकार कमी करण्याचे प्रयत्न असल्याचे ठाकरे म्हणाले.

Advertisement
Advertisement