Advertisement
नागपूर : इंद्रजित सावंत यांना धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य नागपूरच्या प्रशांत कोरटकरने केले होते. या मुद्द्यावरून मोठा वाद पेटल्यानंतर कोरटकर विरोधात कोल्हापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र हे काळातच कोरटकर फरार झाला होता.
आता तेलंगणामधून त्याला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली. याच पार्श्वभूमीवर प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली.
न्यायालयाने आता प्रशांत कोरटकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याच्याआधी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती ती कोठडी संपल्यानंतर आज कोरटकरला कोर्टासमोर हजर करण्यात आले होते.