नागपूर : भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणत्या नेत्याची वर्णी लागणार ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात सुरु आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.नड्डा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नड्डा यांचा कार्यकाळही संपला आहे.
त्यामुळे भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण ? यावरून तर्क-वितर्क काढण्यात येत आहे.
पक्षाच्या स्थापना दिनाआधी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर करण्यावर भाजपचा भर असल्याची माहिती समोर आली आहे. संघटनात्मक नाव नोंदणी पूर्ण झाल्याने अध्यक्षांचे नाव आता जाहीर होणार आहे.सध्या तरी भाजपातील चार महत्त्वाची नावे या पदासाठी चर्चेत आहेत.
भाजप अध्यक्षपदासाठी भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे, डी पुरंदरेश्वरी यांची नावे आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. ६ एप्रिलला भाजपाचा स्थापना दिवस आहे. त्यामुळे या दिवशी नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. आता यामधील भाजपच्या अध्यक्षपदी कुणाच्या नावाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.