नागपूर: शहरातील पारडी फ्लायओव्हर चढताना नागपूरकरांना एका रांगेत पहाडांच्या रंगा दिसतील. नागरिकांच्या डोळ्यांना हे आकर्षक दिसत असले तरी अचानक शहराच्या मध्यवर्ती भागात या पर्वत रांगा आल्या कुठून असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.प्रत्यक्षात मात्र यामागची खरी स्टोरी वेगळीच आहे. या खास स्टोरीवर ‘नागपूर टुडे’ ने प्रकाश टाकला.
पारडी उड्डाणपुलावरून जाताना एका रांगेने तुम्हाला व्हिडिओमध्ये पर्वत रांगा दिसत आहेत. त्या पर्वत रांगा नसून प्रत्यक्षात कचऱ्याचे डोंगर आहे.
नागपुरात कचरा व्यवस्थापनाचे मोठे आव्हान भेडसावत आहे. कारण भांडेवाडीसारख्या मोठ्या कचराकुंड्या दररोज १०,००० टनांपेक्षा जास्त कचरा गोळा करतात, ज्यामुळे “कचऱ्याचे डोंगर” तयार होत आहेत. डोंगरा सारख्या दिसणाऱ्या कचराकुंड्या पर्यावरणीय आणि आरोग्यासाठी धोकादायक आहेत.
स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात –
नागपूर शहराच्या मध्यभागी हा कचऱ्याचा ढीग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. स्थानिक नागरिकांसाठी तो मोठा आरोग्याचा धोका बनला आहे. या भागात राहणाऱ्या हजारो नागरिकांना दुर्गंधी आणि प्रदूषणामुळे जगणं कठीण झालं आहे. नागरिकांच्या तक्रारींनुसार, “घराच्या बाहेर पाऊल टाकताच इतकी दुर्गंधी येते की श्वास घ्यायलाही त्रास होतो.
नागपूर टुडे च्या टीमने परिसरात राहणाऱ्या काही नागरिकांशी संवाद साधला असता त्यांनी अशा प्रकारे आपल्या अडचणी मांडल्या.
मनपा प्रशासन कधी जाग येणार ?
नागपूर महानगरपालिकेने (NMC) अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. एकीकडे नागपूरला स्मार्ट सिटी बनवण्याच्या गप्पा मारल्या जात आहेत, तर दुसरीकडे शहरात नागरिकांसाठी घातक असलेला हा कचऱ्याचा डोंगर वाढत चालला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवला जावा, अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.