नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच लागू केलेल्या नव्या टॅरिफ धोरणामुळे जागतिक बाजारपेठेत अनेक वस्तूंच्या किमतीत मोठा फरक पडणार आहे. २ एप्रिल ‘लिबरेशन डे’ निमित्त ट्रम्प प्रशासनाने दोन नवी टॅरिफ पद्धती लागू केल्या आहेत.
१०% युनिव्हर्सल इम्पोर्ट ड्युटी (सार्वत्रिक कर) आणि रेसिप्रोकल टॅरिफ (परस्पर शुल्क) यांचा समावेश आहे. या टॅरिफमुळे अनेक जीवनावश्यक वस्तू महाग होणार असून, त्याचा परिणाम ग्राहकांवर होईल.
काय महागणार आहे?
१ . इलेक्ट्रॉनिक उपकरणे:
आयफोन, टीव्ही आणि इतर गॅझेट्स महागणार.
चीन, तैवान, दक्षिण कोरियासारख्या देशांवर ३४% रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याचा निर्णय.
भारतीय आयातीवर २६% शुल्क वाढणार.
२. ऑटोमोबाईल्स:
आयात केलेल्या गाड्यांवर २५% अतिरिक्त कर.
अमेरिकन ग्राहकांना २५०० ते २०,००० डॉलर्स अधिक द्यावे लागणार.
३. कपडे आणि शूज:
चीन (३४%), व्हिएतनाम (४६%) आणि बांगलादेश (३७%) यांच्यावर अतिरिक्त कर.
वॉलमार्ट आणि टार्गेटसारख्या स्टोअरमधील कपडे महागणार.
४. वाईन आणि स्पिरिट्स:
युरोपियन युनियन व युनायटेड किंग्डमच्या उत्पादनांवर २०% आणि १०% शुल्क वाढणार.
फ्रेंच वाईन आणि स्कॉटिश व्हिस्कीच्या किमती वाढणार.
५. फर्निचर:
चीन आणि व्हिएतनाममधून येणाऱ्या फर्निचरवर ३०% ते ४०% शुल्क.
६. कॉफी आणि चॉकलेट:
ब्राझील आणि कोलंबियातून येणाऱ्या कॉफी बीन्सवर १०% टॅरिफ.
कोटे डी’आयव्होअर आणि इक्वेडोरच्या कोको बीन्सवर २१% आणि १०% शुल्क.
७. स्विस घड्याळे:
स्विस घड्याळांच्या आयातीवर ३१% कर वाढ.
रोलेक्ससह सर्व ब्रँड्सच्या किमती वाढणार.
ग्राहकांना मोठा फटका-
या नव्या टॅरिफमुळे इलेक्ट्रॉनिक्स, वाहनं, कपडे, अन्नपदार्थ आणि लक्झरी वस्तूंच्या किमती वाढणार आहेत. परिणामी, सामान्य ग्राहकांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागू शकतो.
आंतरराष्ट्रीय बाजारात चिंता-
ट्रम्प यांच्या या नव्या धोरणामुळे व्यापारयुद्धाला खतपाणी मिळू शकते आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर परिणाम होऊ शकतो. चीन, भारत आणि युरोपियन युनियन यांसारख्या देशांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
नवीन टॅरिफ धोरणाचे परिणाम लवकरच दिसणार-
९ एप्रिलपासून हे नवीन टॅरिफ लागू होणार असून, अमेरिकन बाजारपेठेत महागाईचा मोठा फटका बसेल, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.