Advertisement
नागपूर: भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी १४ एप्रिल रोजी नागपूर महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मनपा मुख्यालयात बाबासाहेबांच्या तैलचित्राला पुष्प अर्पण करुन वंदन केले. त्यानंतर त्यांनी संविधान चौकात भेट देऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी., अतिरिक्त आयुक्त श्री अजय चारठाणकर, उपायुक्त अशोक गराटे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. बी.पी.चंदनखेडे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.