नवी दिल्ली:हरियाणातील हिस्सारमध्ये आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत अनेक मुद्द्यांवर निशाणा साधला. त्यांनी काँग्रेसवर मुस्लिम समाजाचे केवळ लांगूलचालन केल्याचा आरोप करत प्रश्न उपस्थित केला की, “जर काँग्रेसला मुस्लिमांची एवढी कळवळा असेल, तर त्यांनी आजपर्यंत एखाद्या मोदींनी आरोप केला की, काँग्रेसने मुस्लिम समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित न करता, काही कट्टरपंथीयांना खुश करण्यासाठी केवळ प्रतीकात्मक राजकारण केले.
त्यामुळे संपूर्ण मुस्लिम समाजाचा विकास न होता, त्यांना शिक्षण आणि प्रगतीपासून दूर ठेवलं गेलं. वक्फ कायद्याचा उदाहरण देत मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे समाजात असमतोल निर्माण झाला आहे.
पुढे बोलताना मोदींनी बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करत काँग्रेसवर गंभीर आरोप केले. बाबासाहेबांनी सामाजिक न्यायाचं स्वप्न पाहिले होते, पण काँग्रेसने त्यांच्या विचारांचा आणि संविधानातील तरतुदींचा अपमानच केला आहे, असं ते म्हणाले.
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या आत्म्यालाच काँग्रेसने दुखावल्याचा आरोप करत, मोदींनी म्हटलं की काँग्रेसने सत्ता टिकवण्यासाठी संविधानाचा वापर केवळ राजकीय फायद्यासाठी केला.