Advertisement
मुंबई:मुंबईतील राजभवन येथे आज एक महत्त्वपूर्ण शपथविधी सोहळा पार पडला. राहुल पांडे यांनी राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून शपथ घेतली. त्यांच्या बरोबर रवींद्र ठाकरे, प्रकाश इंदलकर आणि गजानन निमदेव यांनी राज्य माहिती आयुक्तपदाची शपथ घेतली.
या शपथविधी सोहळ्याला विविध मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरून या सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले असून त्यांनी म्हटले आहे, “माहिती अधिकाराचे रक्षण करत नागरिकांना सशक्त बनवण्यासाठी ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वांना त्यांच्या भावी कारकीर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!”
राज्यात माहितीचा अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि पारदर्शक प्रशासनासाठी ही नवीन नियुक्ती मोठी पावले उचलणारी ठरणार आहे, अशी नागरिकांमध्ये अपेक्षा व्यक्त होत आहे.