Published On : Tue, Mar 21st, 2017

मंगोलियन शिष्टमंडळाने जाणून घेतली ‘स्मार्ट स्ट्रीप’ची माहिती

Advertisement


नागपूर: मंगोलिया येथील शिष्टमंडळ आणि जीआयझेड नेक्सस सदस्यांच्या एका शिष्टमंडळाचे आज (ता. २०) नागपुरात आगमन झाले. ‘स्मार्ट सिटी’तील आदर्श म्हणून विकसित होत असलेल्या ‘स्मार्ट स्ट्रीप’ची पाहणी शिष्टमंडळाने केली. उद्या मंगळवारी सदर शिष्टमंडळ भांडेवाडी येथील एसटीपी प्रकल्प आणि महाजनकोला भेट देणार आहे.

सदर शिष्टमंडळाचे आगमन आज २० मार्च रोजी सकाळी ११ वाजता आगमन झाले. सर्वप्रथम निरीला भेट देऊन वरिष्ठ वैज्ञानिकांसोबत बैठक आणि चर्चा केली. दुपारी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली असलेल्या व सार्वजनिक वाय-फाय सुविधा देणाऱ्या शहराची ‘स्मार्ट स्ट्रीप’ असलेल्या वेस्ट हायकोर्ट मार्गावरील शंकर नगर चौकाला भेट दिली व माहिती जाणून घेतली. शिवाय २४ तास पाणी पुरवठा असलेल्या वॉर्डांची पाहणी केली. यावेळी मनपाचे उपअभियंता दुपारे यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

या चमूमध्ये गिझ नेक्सस येथील प्रोजेक्ट डायरेक्टर रुठ एरबेक, तांत्रिक तज्ज्ञ आल्फ ट्रॉस, मंगोलियाचे राष्ट्रीय समन्वयक एस. टीसेरेदास, मंगोलिया येथील उलानबंटूर शहरातील महापौर कार्यालयातील प्रमुख व उलानबंटूर शहर प्रकल्पाचे महाव्यवस्थापक टी. गंतुमूर, महापौर कार्यालयातील जल व सांडपाणी विषयाचे संचालक तुरखू, झॉरिटसारुजखंगई, वरिष्ठ अधिकारी तुमूरबतर, श्री. बोरोचुलून तुमेनजार्गल, आयसीएलइआय साऊथ एशियाचे प्रकल्प सहायक धिर्ती जाडे, व्यवस्थापक रितू ठाकूर यांचा समावेश आहे. त्यांच्यासह नागपूर महानगरपालिकेचे महापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व अन्य संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Gold Rate
18 April 2025
Gold 24 KT 95,900 /-
Gold 22 KT 89,200 /-
Silver / Kg - 96,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement