Published On : Tue, Apr 18th, 2017

Pune: पुण्यातील अपघातात लेकीनंतर आईचाही मृत्यू

Advertisement

Pune Accident
पुणे:
पुण्यातील बाणेरमध्ये १७ एप्रिल रोजी कारच्या अपघातात लेकीपाठोपाठ आईचाही मृत्यू झाला आहे. इशा विश्वकर्माची आई पूजा विश्वकर्मा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बाणेरमध्ये भरधाव कारनं दुभाजकावरील 5 जणांना उडवलं. यात पूजा विश्वकर्मा यांची चिमुकली ईशा विश्वकर्माचाही मृत्यू झाला. तर कार चालक आरोपी महिला सुजाता जयप्रकाश हिला अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील बाणेरमध्ये डी मार्टमधून खरेदी करून रस्ता ओलांडताना डिव्हायडरवर असलेल्या पाच जणांना कारनं उडवलं. काल दुपारी अडीचच्या सुमारास इशिता आणि साजिद ही मुलं आपल्या आईसोबत डी मार्टमधून घरी परतत होते. रस्ता ओलांडताना गाड्यांची रहदारी सुरु असल्यानं तिघंही दुभाजकावर उभे होते. मात्र भरधाव वेगात आलेल्या i20 गाडीनं त्यांना धडक दिली.

या दुर्घटनेत एका चिमुकलीचा मृत्यू झाला. तर तिची आई पूजा विश्वकर्मा गंभीर जखमी होत्या. त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी महिला चालक सुजाता जयप्रकाश पुण्याहून बालेवाडीच्या दिशेनं जात होती. बाणेरमध्ये आल्यावर तीचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि तीनं दुभाजकावरील पाच जणांना जोरदार धडक दिली.

Gold Rate
21 April 2025
Gold 24 KT 96,700 /-
Gold 22 KT 89,900 /-
Silver / Kg 96,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सुजाता एका बांधकाम व्यावसायिकाची पत्नी असल्याचं बोललं जात आहे. अपघातात चालक महिलाही जखमी झाली आहे. अपघातानंतर चालक महिला कारमधून उतरत जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. पोलिसांनी सुजाता जयप्रकाश हिला अटक केली आहे.

Advertisement
Advertisement