मुंबई: नुकतंच मॅनफोर्सची जाहिरात बंद करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्याला आता बेबी डॉल सनी लिओनीनं प्रत्युत्तर दिलं आहे. मॅनफोर्स कंडोमच्या जाहिरातीत करण्यात आलेले चित्रण हे सर्व कुटुंबानं एकत्रितपणे बसून पाहण्याजोगे नाही असा आरोप करत रिपाइंच्या आठवले गटाच्या महिला आघाडीने या जाहिरातीच्या प्रसारणावर बंदीची मागणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे. त्यावर सनीनं प्रत्युत्तर दिलं आहे.
सनी म्हणााली आहे की लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या भारतातील सर्वांत महान गोष्टी आहेत. जर लोकांना माझ्याविरोधात बोलायचं असल्यास तो त्यांना अधिकार आहे. मात्र काय योग्य आहे आणि काय योग्य नाही हे सरकार ठरवू शकते आणि त्यावर निर्णय घेऊ शकते.
सनीनं स्पष्ट केलं की मी जाहिरात केवळ पैसे कमवण्यासाठी करत नाही, जेव्हा मी एखाद्या ब्रँडसोबत काम करते तेव्हा त्याची नैतिक जबाबदारीही स्वीकारते. कोणतेही जोडपे बाळ जन्माला घालण्याचं तेव्हाच नियोजन करतं जेव्हा ते पूर्णतः त्याबाबतची जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार असतात. मी स्वीकारत असलेल्या जाहिरातींबाबतही माझा अशाच प्रकारचा दृष्टीकोन असतो.
सनीनं बंदी घालण्याची मागणी करणा-याला संविधानिक भाषेत उत्तर देऊन विरोधकांची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. आता यावर रिपाइंची महिला आघाडी काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.