Published On : Wed, May 3rd, 2017

सरकारने 7/12 दुरुस्ती आणि चावडी वाचन विशेष मोहीम केली सुरु

Advertisement

sat-bara
मुंबई:
7/12 उतारा हा प्रत्येक शेतकऱ्याच्या दृष्टीकोनातून महत्वाचा विषय. या सात बाराच्या उताराबाबत सगळी माहिती मिळणं आवश्यक असते. याचसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महत्त्वाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. सरकारने 7/12 दुरुस्ती आणि चावडी वाचन विशेष मोहीम सुरु केली आहे. यानुसार तुमचा ऑनलाईन सात-बारा उतारा योग्य आहे का हे तपासून पाहा. आणि काही फेरबदल असेल तर तो तातडीने करून घ्या.

तुम्ही तुमचा सात/बारा https://mahabhulekh.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर पाहू शकाल.

असा असेल या मोहिमेचा दिनक्रम
जर तुमच्या उताऱ्यात काही त्रुटी असतील तर 1 मे 2017 ते 15 मे 2017 पर्यंत गावातील तलाठ्याशी संपर्क साधा.

Gold Rate
Saturday18 Jan. 2025
Gold 24 KT 79,600 /-
Gold 22 KT 74,000 /-
Silver / Kg 90,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

15 मे ते 15 जून 2017
यानंतर 15 मे 2017 ते 15 जून 2017 पर्यंत संगणीकृत 7/12 चे चावडी वाचन होईल. यामध्येही काही आक्षेप असल्यास, गाव तलाठीशी संपर्क साधा.

16 जून ते 31 जुलै 2017
संगणकीकृत 7/12 मधील माहितीत प्राप्त आक्षेपांचा विचार करुन आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात येतील.

1 ऑगस्ट 2017
1 ऑगस्टपासून तुम्हाला डिजीटल स्वाक्षरीत 7/12 उपलब्ध होतील. त्यासाठी तुम्हाला चावडीत/ग्राम पंचायतमध्ये किंवा तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नसेल.

सध्या काही जिल्ह्यात ऑनलाईन सातबारा दिला जात नाही. दफ्तरातील सातबारा आणि संगणकावरील सातबारा यामध्ये थोडी तफावत असल्याने 7/12 नाहीत. त्यामुळेच सार्वत्रिक ऑनलाईन सात-बारा सध्या उपलब्ध करुन देण्यात आलेला नाही. ही त्रुटी दूर करण्यासाठीच एडिट मोडूल म्हणजेच सात-बारा दुरुस्तीचे सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

सध्या सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी ऑनलाईन पद्धतीने याच कामात गेल्या नऊ महिन्यांपासून व्यस्त आहेत. आता सर्वच जिल्ह्याची एडिटची सरासरी टक्केवारी 80 % झाली आहे. 20% राहिलेले काम झाले की सर्व सातबारे ऑनलाईन उपलब्ध होतील. यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता असणार नाही. ऑनलाईन पैसे देऊन किंवा महा ई सेवा केंद्रातून डिजीटल सहीचा वैध कायदेशीर सात – बारा मिळेल.

सर्व नागरिक आणि शेतकरी यांना आवाहन करण्यात येत आहे की मोबाईलवर,महा ई सेवा केंद्र, सायबर कॅफे या ठिकाणी महाभूलेख या वेबसाईटवर आपण आपला सातबारा तपासावा. काही त्रुटी असतील तर तातडीने तलाठ्याच्या निदर्शनास आणून द्या, म्हणजे तो सातबारा दुरुस्त करता येईल.

Advertisement