Published On : Fri, Jul 21st, 2017

पाकिस्तानची ही साधीसुधी नामुष्की नव्हे तर जागतिक बेइज्जती – शिवसेना

Advertisement


मुंबई: अमेरिकेने दहशतवादाला खतपाणी घालणा-या देशांची यादी नुकतीच जाहीर केली असून यात पाकिस्तानचीही पुन्हा एकदा पोलखोल झाली आहे. पाकिस्तानवर लावण्यात आलेल्या ठपक्यावर शिवसेनेने आपलं मत व्यक्त केलं आहे. पाकिस्तानची ही साधीसुधी नामुष्की नव्हे तर जागतिक बेइज्जती असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. तसेच, आता अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने ‘‘पाकिस्तान हा दहशतवाद आणि दहशतवाद्यांचा पाठीराखा देश आहे’’ असे जाहीर करून उशिरा का होईना, हिंदुस्थानच्या पाकविषयक भूमिकेवर शिक्कामोर्तबच केले आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

शिवसेनेचे मुख्यपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाकिस्तानवर आणि त्यांच्या दहशतवादी कारवायांवर आगपाखड केलीये. पाकिस्तान हा कुत्र्याचे शेपूट आहे ते कधीच सरळ होत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची भावना या लेखात व्यक्त करण्यात आली आहे.

सामनाच्या अग्रलेखातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे:
* अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेने पाकिस्तान हे दहशतवाद्यांचे नंदनवन आहे असे सर्टिफिकेटच आता पाकड्यांच्या तोंडावर फेकून मारले आहे. ही साधीसुधी नामुष्की नव्हे तर जागतिक बेइज्जती आहे. अर्थात, अमेरिकेने दहशतवाद्यांचा पोशिंदा म्हणून जाहीर केले तरी पाकिस्तानचे चरित्र बदलणार नाही. कारण कुत्र्याचे शेपूट कधीच सरळ होत नाही याचा अनुभव आपण वारंवार घेतला आहे!

Gold Rate
Wednesday 07 Jan. 2025
Gold 24 KT 77,400 /-
Gold 22 KT 72,400 /-
Silver / Kg 89,900 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

* पाकिस्तान हा दहशतवादाचा, अतिरेक्यांचा पोशिंदा आहे अशी रीतसर घोषणाच अमेरिकेने बुधवारी केली. अर्थात पाकिस्तानच्या बुरख्याआड लपलेले हे सत्य सा-या जगालाच ठाऊक होते. लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद, हिजबुल मुजाहिदीन या व अशा अनेक दहशतवादी संघटनांना पोसण्याचे काम पाकिस्तान राजरोसपणे करीत असतो. या अतिरेकी संघटनांच्या माध्यमातून हिंदुस्थानवर क्रूर हल्ले चढवायचे, निरपराध्यांची हत्याकांडे घडवायची हाच पाकड्यांचा आवडता खुनी खेळ आहे.

* पाकिस्तानात आजवर कित्येक राज्यकर्ते आले आणि गेले, लष्करी राजवटी आल्या आणि गेल्या, पण रक्ताला चटावलेल्या दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्याऐवजी अतिरेकी संघटनांचे जाळे वाढवण्यासाठीच पाकिस्तानची सर्व सरकारे आजवर झटत राहिली. हिंदुस्थानसारखा सोशिक देश गेली 40 वर्षे पाकिस्तानी दहशतवादाचे चटके सहन करतो आहे. याविषयी हिंदुस्थान कित्येक वर्षांपासून जागतिक पातळीवर आवाज उठवतो आहे. आता अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने ‘‘पाकिस्तान हा दहशतवाद आणि दहशतवाद्यांचा पाठीराखा देश आहे’’ असे जाहीर करून उशिरा का होईना, हिंदुस्थानच्या पाकविषयक भूमिकेवर शिक्कामोर्तबच केले आहे.

* 12 देशांच्या या यादीत पाकिस्तानचाही समावेश करून अमेरिकेने पाकिस्तानी राज्यकत्र्यांना जोरदार चपराक लगावली आहे. जे पाकिस्तानी अतिरेकी इतर देशांत जाऊन दहशतवादी हल्ले घडवतात तो चांगला दहशतवाद आणि तेहेरिक-ए-तालिबानसारख्या अतिरेकी संघटनांकडून पाकिस्तानात केले जाणारे हल्ले म्हणजे वाईट दहशतवाद अशी दुटप्पी आणि सोयीची व्याख्या पाकिस्तान सरकारने केली असा ठपका अमेरिकेने या अहवालात ठेवला आहे.

* अफगाणिस्तानात अमेरिकेविरुद्ध लढणा-या अफगाण-तालिबानच्या हक्कानी नेटवर्वâविरुद्ध पाकिस्तान कारवाई करत नाही. उलट अमेरिकेविरुद्ध लढण्यासाठी अफगाणी-तालिबान्यांना संरक्षण आणि बळ देण्याचे काम पाकिस्तानकडून सुरू आहे असा आरोप करून अमेरिकेने पाकच्या दहशतवादविरोधी लढाईतील पोकळपणाच जगासमोर आणला आहे. हिंदुस्थानात दहशतवादी हल्ले घडवण्यासाठी लश्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमदसारख्या संघटनांना पाकिस्तान सर्वतोपरी मदत करत आहे. या संघटनांनी हिंदुस्थानवर हल्ले चढवावेत यासाठी पाकिस्तान आपली ताकद पणाला लावत आहे.

* अतिरेकी संघटनांचे पाकिस्तानातून बिनदिक्कत संचलन करणे, अतिरेकी संघटनांना मजबूत करण्यासाठी पाकिस्तानातूनच प्रचंड पैसा उभा करून देणे, अतिरेक्यांना खुलेआम प्रशिक्षण देणे असे धंदे पाकिस्तान सरकारच्याच पाठिंब्यावर राजरोसपणे सुरू आहेत असा धडधडीत उल्लेख अमेरिकेने आपल्या अहवालात केला आहे. थोडक्यात सांगायचे तर अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेने पाकिस्तान हे दहशतवाद्यांचे नंदनवन आहे असे सर्टिफिकेटच आता पाकड्यांच्या तोंडावर फेकून मारले आहे. ही साधीसुधी नामुष्की नव्हे तर जागतिक बेइज्जती आहे. अर्थात, इज्जतीचा आणि पाकिस्तानचा अर्थाअर्थी कधीच संबंध आला नाही.

* आंतरराष्ट्रीय पातळीवर वारंवार अब्रूचे धिंडवडे निघूनही पाकिस्तानसारख्या कोडग्या आणि निलाजNया देशावर त्याचा यत्विंâचितही परिणाम कधी झाला नाही. दहशतवादाचा मार्ग सोडायला हा देश तयार नाही. जिहादच्या नावाखाली तरुणांची माथी भडकवणे, दहशतवादी संघटनांना राजाश्रय देणे, आयएसआय आणि सैन्याच्या निगराणीत अतिरेक्यांची प्रशिक्षण केंद्रे चालविणे या सगळ्या कामांसाठी पाकिस्तान सरकारकडूनच आर्थिक रसद पुरवली जाते. किंबहुना दहशतवाद हा पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचाच एक भाग आहे. त्यामुळे अमेरिकेने दहशतवाद्यांचा पोशिंदा म्हणून जाहीर केले तरी पाकिस्तानचे चरित्र बदलणार नाही.

* अमेरिकन अहवालाला घाबरून पाकिस्तानातील अतिरेकी संघटनांची कार्यालये बंद होतील, दहशतवादी संघटनांच्या प्रशिक्षण वेंâद्रांना कुलुपे ठोकली जातील आणि हिंदुस्थानवरील हल्ले बंद करण्याचा साक्षात्कार पाकड्यांना होईल अशा भ्रमात कोणी राहू नये. कारण कुत्र्याचे शेपूट कधीच सरळ होत नाही याचा अनुभव आपण वारंवार घेतला आहे!

Advertisement