Advertisement
नागपूर: झारखंडमधील आदित्यपूर नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष आणि सध्याचे सदस्य पुरेंद्र नारायण सिंह यांनी नागपूर महानगरपालिकेला भेट दिली. महापौर नंदा जिचकार यांची भेट घेऊन नागपूरमध्ये सुरू असलेल्या २४ बाय ७ ची व स्वच्छता जनजागृती मोहिमेची प्रशंसा केली.
याप्रसंगी स्थायी समिती सभापती संदीप जाधव, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, उपसभापती स्नेहल बिहारे, माजी महापौर प्रवीण दटके, मनपातील भाजपच्या प्रतोद दिव्या धुरडे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक जगदीश ग्वालबंशी प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकेने सुरू केलेली कचरा वर्गीकरणाची मोहीम प्रशंसनीय आहे. त्याबद्दल महापौर नंदा जिचकार यांचे अभिनंदन केले. शहरात इथेनॉलवर चालणाऱ्या ग्रीन बसेसचेही त्यांनी कौतुक केले.