Published On : Wed, Sep 27th, 2017

पंकजा मुंडेंना पुन्हा झटका, नाथ्रा ग्रामपंचायत धनंजय मुंडेंच्याच ताब्यात

Advertisement

dhananjay munde
परळी (बीड): नाथ्रा ग्रामपंचायत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेतली आहे. गावच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीमती कमलबाई माणिकराव मुंडे बिनविरोध निवडून आल्या आहेत. तसेच 9 पैकी राष्ट्रवादीचे 5 ग्रामपंचायत सदस्यही बिनविरोध निवडून आले आहेत. दरम्यान, या घडामोडीमुळे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेंनी चांगलाच धक्का दिला आहे.

स्थानिक नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समितीसह गावच्या ग्रामपंचायतीही धनंजय मुंडेंनी वर्चस्व प्रस्थापित केल्याने पंकजा मुंडेंना आगामी निवडणुकीत धोक्याची घंटा वाजल्याचे मानले जात आहे. धनंजय मुंडे यांचे जन्मगाव असलेल्या व प्रतिष्ठेच्या नाथ्रा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. 7 ऑक्टोबर रोजी होणार्‍या या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख होती. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या मुदतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलच्या सरपंचपदाच्या उमेदवार श्रीमती कमलबाई माणिकराव मुंडे यांचाच एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्या बिनविरोध विजयी झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकार्‍यांनी जाहीर केले.

9 सदस्यांच्या निवडीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग 1 मधून सुमनबाई विश्वनाथ मुंडे, सुमनबाई मधुकर मुंडे, प्रभाग 2 मधून नागनाथ मारोती मुंडे, प्रभाग 3 मधून नारायण संभाजी मिसाळ, सखुबाई शिवाजी किरवले हे पाच सदस्य बिनविरोध निवडून आल्याचे निवडणुक निर्णय अधिकार्‍यांनी जाहीर केले. सरपंचपदासह 9 पैकी 5 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य बिनविरोध विजयी झाल्याने ही ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुन्हा ताब्यात आली आहे. इतर बिनविरोध निवडून आलेल्या चार सदस्यांमध्ये महादेव विश्वनाथ मुंडे, सुभाष सोमाजी मुंडे, भाग्यश्री जीवन मुंडे, ज्योती राहुल सुर्यवंशी यांचा समावेश आहे.

Advertisement
Today's Rate
Thursday 19 Dec. 2024
Gold 24 KT 76,000/-
Gold 22 KT 70,700/-
Silver / Kg 88,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पाच वर्षापूर्वी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पॅनेलचा दणदणीत विजय झाला होता. पाच वर्षात ग्रामपंचायतीमार्फत गावात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केल्यामुळे यावर्षीची ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली. विजयी उमेदवारांचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे यांनी अभिनंदन केले आहे. निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यानी जल्लोष केला.

Advertisement