मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे राज भवन पाहण्यास येणाऱ्या अभ्यंगतासाठी बॅटरीवर चालणारे वाहन पर्यटन मंत्री, जयकुमार रावल यांनी आज राजभवन मुंबई येथे दिली.
राजभवन हे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे अधिकृत निवासस्थान आहे. सामान्य लोकांना हे ठिकाण पाहता यावे यासाठी वारसा स्थळाची कवाडे सामान्यांसाठी खुली केली जातात. ही दोन तासांची भ्रंमती करण्यासाठी बॅटरीवर चालणारे हे वाहन उपयुक्त ठरणार आहे.
राजभवन येथे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे बॅटरीवर चालणारे वाहन देण्यात आले आहे. पर्यटनस्नेही पर्यटन यामुळे आता शक्य होणार आहे. वृध्द व अपंग व्यक्तींसाठी याचा वापर करण्यात येणार आहे.
राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी २१ जून 2015 रोजी राज भवन सर्वांसाठी खुले करण्याची घोषणा केली होती व प्रत्यक्षामध्ये 01 सप्टेंबर 2015 पासून ऑन लाईन बुंकींग करुन राज भवन सर्वसामान्यांसाठी खुले केले आहे.
राज्यपालांनी प्रत्येक महिन्याचा चौथा शनिवार हा जेष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत.