Published On : Sat, Nov 25th, 2017

‘नाग नदी विकास’ अभ्यासासाठी फ्रान्सचे अर्थसहाय्य

Naag River
नागपूर: नागपुरातील महत्त्वाकांक्षी ‘नाग नदी विकास’ प्रकल्पाचा अभ्यास करून आराखडा तयार करण्यासाठी फ्रान्स सरकारच्या अख्यत्यारीत असलेली फ्रेंच डेव्हलपमेंट एजंसी (एएफडी) अर्थसहाय्य करणार आहे. इंडो-फ्रेंच अर्बन डेव्हलपमेंड ॲण्ड स्मार्ट सिटी कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी उपसंचालक ऐरवे द्‌युब्रई (Herve Dubreuil) यांनी ही माहिती दिली.

नागपूर महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहात कार्यशाळेचा समारोप झाला. महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या समारोपीय कार्यक्रमाला स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त अश्विन मुदगल, अतिरिक्त आयुक्त डॉ. आर. झेड. सिद्दीकी, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त रवींद्र देवतळे, उपायुक्त राजेश मोहिते, मनपाचे कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, प्रमुख अधिकारी (सरोवरे आणि नद्या) मो. इसराईल, उपअभियंता (स्मार्ट सिटी प्रकल्प) राजेश दुपारे, निरीचे माजी संचालक तपन चक्रवर्ती, एनईएसएल चे एस. एस. हस्तक उपस्थित होते.

२० ते २४ नोव्हेंबरदरम्यान आयोजित कार्यशाळेत इंडो-फ्रेंचचे कन्सल्टंट सिग्नेस पेसेजेस, सुऐझ सेफेज आणि मे. पी.के. दास ॲण्ड असोशिएटस्‌ यांच्या प्रतिनिधींसह स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत एरिया बेस्ड डेव्हलपमेंटसाठी नगररचना परियोजना (Town Planning Scheme) तयार करणारी एचसीपी, अहमदाबादचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या प्रतिनिधींनी पाच दिवसांत एरिया बेस्ड डेव्हलपमेंट अंतर्गत निवडण्यात आलेल्या पारडी, भरतवाडा, पूनापूर या भागांचा आणि नाग नदीला भेट दिली. एचसीपी आणि एसपीव्ही प्रतिनिधींकडून प्रकल्पाबाबत माहिती जाणून घेतली. या कार्यशाळेदरम्यान सिग्नेस पेसेजेसच्या प्रतिनिधींनी ‘ग्रीन स्पेस डेव्हलपमेंट मेथॉडॉलॉजी’ संदर्भात सादरीकरण केले. प्रमुख अधिकारी (नद्या व सरोवरे) मो. इसराईल यांनी ‘नाग नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पा’संदर्भातील सादरीकरण केले.

Gold Rate
Saturday 01 Feb. 2025
Gold 24 KT 82,700 /-
Gold 22 KT 76,900 /-
Silver / Kg 94,100 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

समारोपीय कार्यक्रमात नाग नदी विकास आणि एरिया बेस्ड्‌ डेव्हलमेंट (एबीडी) संदर्भातील सादरीकरण करण्यात आले. इंडो-फ्रेंच कंपन्यांच्या तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यातून हे प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

महापौर नंदा जिचकार यांनी कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व प्रतिनिधींचे स्वागत केले. इंडो-फ्रेंच कंपन्यांच्या संयुक्त भागीदारीतून होत असलेला विकास कार्यक्रम नागपूर शहराला स्मार्ट सिटी बनविण्यास उपयुक्त ठरेल, असे सांगितले. आयुक्त अश्विन मुदगल यांनीही हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी असल्याचे सांगत एएफडीचे तांत्रिक व आर्थिक सहकार्य हे नागपूरच्या विकासाला नवी दिशा व गती देणारे ठरेल, असे सांगितले.

स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व प्रतिनिधींचे आभार मानले.

कार्यशाळेत डॉ. अरुणकुमार सिंग (एन्व्हॉरॉनिक्स, नवी दिल्ली), सिबिला जॅक्सिक (सिग्नेस, फ्रान्स), रमेश स्वराणकर (सेफगार्ड स्पेशालिस्ट, एएफडी), क्लेमेंट फोरकी (उपमहासंचालक, एस्पिलिया), एलेन कौसेरन (मुख्य संचालक, सिग्नेस), पॅट्रिस बर्गर, सिबॅस्टियन (अर्बालियन), पिअर रिगॉर्डियरा (हायड्रोलॉजिस्ट एक्स्पर्ट, सुऐझ सेफेज), एड्रियन हॉरिज (ट्रॉयसिम पेसेज) सहभागी झाले होते.

Advertisement