नागपुर/कन्हान: गावातुन जाणा-या महामार्गाचे चौपदरीकरण ७० फुट करण्यात येत असल्यामुळे येथील रोजगाराचे साधन हिरावले जावुन अनेकांवर बेरोजगार होण्याची पाळी आली होती. स्थानिक परिस्थितीचा विचार करुन महामार्ग रूंदीकरणात शिथिलता आणावी या मागणीसाठी कन्हान कांद्री दुकानदार महासंघाने माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात आंदोलन पुकारले अखेर या प्रकरणी प्रशासनाने नमते घेत महामार्ग रूंदीकरण ७० फुटावरून ५४ फुट करण्याचे तसेच तसा नवा अहवाल सादर करण्याचे महामार्ग प्रधिकारण संचालक जिचकार यांनी जाहीर केले.
या आंदोलनाचा दुसरा टप्पा आज होता यात कन्हान कांद्री दुकानदार महासंघा तर्फे कन्हान नगर परिषद ला रस्तारुंदीकरणा संदर्भात कामठी शहरात जो न्याय लागू झाला तोच न्याय कन्हान कान्द्री शहरात लागू करण्यात यावा असा ठराव घेण्यात यावा या साठी कन्हान नगर परिषदे वर मोर्चा नेण्यात आला होता. या वेळी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक अभिजित जिचकार यांना बोलावून त्यांच्या सोबत आंदोलन कर्त्यांची चर्चा घडवून आणण्यात आली. यात कन्हान कान्द्री शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे मध्ये भागातून १७ मीटर म्हणजेच ५४ फूट करण्याचे सर्व संमती ने ठरविण्यात आले. यात पाण्याच्या विसर्ग करणाऱ्या नालीचा समावेश सुद्धा करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले, कामठी शहराची परिस्थिती वेगळी असल्यामुळे तसेच भुसंपादनाची किचकट प्रक्रिया असल्यामुळ तेथे रस्त्याचे डिजाईन बदलविण्यात आले.
तर कन्हान शहरात ५४ फूट रस्ता रुंदीकरणाचे नवीन डिजाईन करून काम तातडी ने पूर्ण करण्यात येईल असे महामार्ग संचालन अभिजित जिचकार यांनी जाहीर केले. यावेळी माझी खासदार प्रकाशभाऊ जाधव , नगर परिषद मुख्यधिकारी प्रवीण मानकर , नगराध्यक्ष शंकर चाहांदे, उपाध्यक्ष मनोहर पाठक, कन्हान-कांद्री दुकानदार महासंघाचे अध्यक्ष अक्रम कुरेशी उपाध्यक्ष श्यामजी पिपलवार, सचिव प्रशांत बाजीराव मसार, नामदेव तळस, नफिस खान, जितेंद्र पाली, डॉ श्रीकृष्ण जामोदकर, किपंकज डांगे, सचिन गजभिये, कमलसिंग यादव, संजय खोब्रागडे, अशोक जैन, राजेश फुलझेले, कमलेश पांजरे, प्रदीप गायकवाड, ग्यानेश्वर राजुरकर, छोटु राणे, दिनेश देशमुख, लताफ शेख, महादेव मेश्राम, भोला सिंह, राजेश गांधी, राजेश पोटभरे, प्रकाश बोंदरे व मोठ्या संख्येने व्यावसायिक बांधव उपस्थित होते.