नागपूर: नागपूर हे मुख्यमंत्र्याचे शहर आहे. राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्र्यांचीही जबाबदारी पार पाडत आहेत परंतु त्यांना गेल्या तीन वर्षात गुन्हेगारीला आळा घालता आला नाही असा आरोप विधानसभेचे गटनेते जयंत पाटील यांनी केला.
नागपूर शहरात आणि परिसरामध्ये मागील दहा महिन्यात ८० हत्या झाल्याचा मुद्दा काँग्रेस आमदार सुनिल केदार यांनी सभागृहामध्ये तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. हाच मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी पकडत मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला.
यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी वर्षभरामध्ये शहरातील गुन्हयांच्या संख्येत घट झाली असल्याची माहिती दिली. यावर सवाल करत जयंत पाटील यांनी गुन्हयांच्या संख्येत घट करण्यासाठी सरकारने काय उपाययोजना आखल्या याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दयावी अशी मागणी केली.